•mr•

चित्र

तुला आठवतं का गं ते चित्र ? सूर्य मावळत होता. वारा वहात होता. अथांग.

तुला आठवतं का गं ते चित्र ?

सूर्य मावळत होता. वारा वहात होता. अथांग

पसरलेल्या दर्याच्या लाटा त्वेषाने उसळत होत्या.

आणि पक्षी आपल्या पिलांना उबदार कुशीत घेऊन

हितगुज करत होते...

त्या चित्रामागेसुद्धा एक गोष्ट. मी तुला

केलेलं आव्हान. आठवतं मला, म्हटलं होतं की

दाखवच मला ही सांजवेळ जशीच्या तशी उतरवून.

किनारी पसरलेल्या सोनेरी वाळूमध्ये आपण दोघे

बसलो. तुझ्यासमोर तुझा कॅनव्हास.

आणि आपल्या दोघांच्या मध्ये ठेवलेले सात रंग.

तू चित्र काढू लागलीस. त्या निर्जीव पांढऱ्या

कागदावरही शहारे उमटावेत इतक्या नजाकतीने फिरणारा तुझा हात. तुझ्या बोटांशी चाळे

करणाऱ्या कुंचल्याला काबूत ठेवणारी नाजूक पकड. लालभडक पारदर्शी माणिकाने मढलेल्या

तुझ्या अंगठी मधून त्या पांढऱ्या पाटावर परावर्तीत झालेला रक्तवर्णी प्रकाश...

हे सौंदर्य मला नवीनच होतं. अनिमिष नेत्रांनी

पाहतच राहिलो..

अत्यंत सुंदर रंग उतरत होते त्या कागदावर. ती

गुलाबी छटा पाहताच वाटलं की,

तुझा स्पर्श अनुभवण्याचं भाग्य लाभलेला तो कागद

जणू माझ्या दुर्भाग्याकडे पाहून अभिमानाने स्वतःशीच आनंदून हसतोय.

तुझ्या चेहऱ्याकडे पाहिले मग...

पश्चिमवक्री प्रकाशदूतांनी उजळवलेला तुझा चेहरा,

रंगत चाललेल्या त्या चित्रामधल्या सागरात आकंठ बुडलेले तुझे नेत्र,

हलकेच मान हलवली की चेहऱ्यावर उतरणारी केसांची एक बट आणि डुलणारी

कानामाधली सुवर्ण आभूषणे...

तयार होणाऱ्या त्या चित्राकडे पाहून तू मध्येच

स्वत:शी हसत. तुझे ते नितांत सुंदर स्मितहास्य आणि गालावर पसरणारी लाली.. पाहून

वाटले किती रेखीव सौंदर्य असावे एखाद्याचे...

आकाशामाधल्या त्या कलाकाराने स्वत: बनवलेले

तुझे हे नक्षत्रसौंदर्य, या धरेची शोभा वाढावी म्हणून त्याने

पाठवले असावे कदाचित... मी भान हरपून तुझ्याकडे पाहत होतो. तू त्या चित्रात इतकी

गुंतून गेली होतीस की तुझ्या लक्षातही आला नाही की हा वेडा पाहतोय तुझ्याकडे ...

आणि मग केंव्हा तरी ते चित्र पूर्ण झालं असावं

आणि ते सांगण्यासाठी तू माझ्याकडे पाहिलंस.

तुला पाहणाऱ्या माझ्या डोळ्यात एव्हाना साठलेली

तुझीच प्रतिमा तुला दिसली

आणि त्या निशब्द शांततेमध्ये चिरंतन होऊन

राहिलेलं पुढचे काही क्षण...

आठवतात का ग तुला ?

अजूनही आपण एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो. तू

माझा हात हातात घेतलास.

पॅलेट मध्ये जमा झालेला लाल, भगवा,

पिवळा, गुलाबी आणि सोनेरी रंग...

तो रंग माझ्या हाताला लावलास आणि म्हटलंस,

“तो सूर्य रंगव.”

मी पाहिलं- त्या चित्रामध्ये सूर्य रंगवलेला

नव्हता पांढरा रंग होता.

मग तुझ्या हातानेच माझा हात तू त्या रंगांत

बुडवलास.

रंगाचा ओलसर स्पर्श त्या कागदावर मी अलगद

उमटवला.

माझ्या हातांचा रंग आता तुझ्या हातांनाही लागला

होता.

खूप खूप खूप हट्टाने ते चित्र तू तुझ्याकडे

ठेवून घेतलंस.

आणि तुझ्या हट्टापुढे माझं कधी काही चालंलं

होतं का ?

तू मला मग म्हटलंस की

“चित्र तर मी घेतलं. आता तुझ्याकडे काय ?”

अत्यंत शांतपणे थेट तुझ्या नजरेला नजर भिडवून

मग मीही म्हटलं,

“हातला लागलेला रंग आणि तुझा स्पर्श !”

ओल्या मातीत ठसे उमटवत परतीच्या वाटेवर आपण

निघालो होतो, तेंव्हा सूर्यास्त झाला.

मातीवर उमटलेले ओलसर स्पर्श त्या सागराने

आपलेसे केले.

न जाणो असे किती स्पर्श साठले असतील त्या

सागराच्या उदरात...

आजही मी तिथे जातो. पण तू नसतेस.

आपले शृंगार पाहिलेल्या खळाळणारऱ्या त्या

सागराला मी मारवा ऐकवतो.

माझा भाबडा विश्वास की,

वाऱ्यासोबत वाहणारे माझ्या बासरीचे आर्त स्वर,

आजही सुवर्णभूषणाने मढलेल्या तुझ्या कानामध्ये घुमत असतील. अगदी तसेच

जसा अखंड घुमतो इथल्या नारळी-पोफळीच्या बागांमधून माझा एकाकीपणा.

परतीच्या वाटेवरती मी सूर्याचा निरोप घेतो.

त्या वाटेवर चालताना तुझ्या असंख्य आठवणींनी

गहिवरलेला एक-एक अश्रू त्या सागरामध्ये ओघळतो.

ओहोटीच्या लाटेसोबत मागे मागे सरकत जाणरे पाणी

दिसू लागले की मनात एक वेडी अशा जन्म घेते.

सागराच्या उदरात सामावलेली आपली पाउले पुन्हा

त्या वाळूत उमटतील.

पुन्हा दिसू मला आपण दोघे, हातात

हात धरून चालताना.

हसत-खेळत, एकामेकांमध्ये

रमलेले.

पण तोपर्यंत अंधार झालेला असतो...

-सौरभ राघवेंद्र.

<!--[if gte mso 9]>

Normal

0

false

false

false

EN-US

X-NONE

MR

<![endif]--><!--[if gte mso 9]>

<![endif]--><!--[if gte mso 10]>

/* Style Definitions */

table.MsoNormalTable

{mso-style-name:"Table Normal";

mso-tstyle-rowband-size:0;

mso-tstyle-colband-size:0;

mso-style-noshow:yes;

mso-style-priority:99;

mso-style-parent:"";

mso-padding-alt:0in 5.4pt 0in 5.4pt;

mso-para-margin-top:0in;

mso-para-margin-right:0in;

mso-para-margin-bottom:8.0pt;

mso-para-margin-left:0in;

line-height:107%;

mso-pagination:widow-orphan;

font-size:11.0pt;

mso-bidi-font-size:14.0pt;

font-family:"Calibri","sans-serif";

mso-ascii-font-family:Calibri;

mso-ascii-theme-font:minor-latin;

mso-hansi-font-family:Calibri;

mso-hansi-theme-font:minor-latin;

mso-bidi-font-family:Utsaah;}

<![endif]-->