•mr•

जॅझ

 जॅझ. वूडन फ्लोअर. वर्दळ. सिगारेट्सचा दर्प. व्हिस्की. बर्फाळलेली संध्याकाळ काचेच्या पलिकडे, अलिकडे मी. जॅझ. वूडन फ्लोअर. वूडन फ्लोअरवर ठेका धरणारा माझा लेदरचा अस्वस्थ बूट. सिगरेटच्या धुरात धूस…

 जॅझ. वूडन फ्लोअर. वर्दळ. सिगारेट्सचा दर्प. व्हिस्की. बर्फाळलेली संध्याकाळ काचेच्या पलिकडे, अलिकडे मी. जॅझ. वूडन फ्लोअर. वूडन फ्लोअरवर ठेका धरणारा माझा लेदरचा अस्वस्थ बूट. सिगरेटच्या धुरात धूसर वर्दळ. व्हिस्की बर्न. काचेच्या पलिकडे धावणारं शहर, अलिकडे मी. जॅझ. वूडन फ्लोअर. वूडन फ्लोअरच्या बॅकड्रॉपवर चकचकीत हाय-हिल्स. व्हेरा व्हँग प्रिन्सेस. काचेवर प्रतिबिंबं, प्रतिबिंबांत मी. जॅझ. वूडन फ्लोअर. कोलाहल आणि शांततेचा मध्य. काचेशी खेळणारा सिगारेटचा धूर. बर्फाळलेल्या आभाळाखालचे उबदार रंग. जॅझ. वूडन फ्लोअर. वर्दळ. शांतता. एक दीर्घ श्वास. आणखी एक.

आणखी एक.

- सौरभ राघवेंद्र.