चित्रकाव्य २ | ज्योत
ज्योत.
ज्योत.
अंधार दाटला होता
रात्र पसरली होती
पण त्याची एकाकी
चूल पेटती होती.
वारा सुटला होता
समई विझली होती
मिणमिणती त्याची पणती
ज्योत तेवती होती.
तो थकला होता कष्टी
अन् तशाच त्या अवशिष्टी
स्मरती दोन चिमुकली
त्याते वाट पाहती बाई.
अंधार दाटला होता
रात्र पसरली होती
पण त्याची एकाकी
चूल पेटती होती.
- सौरभ राघवेंद्र.
Tags: