लोकांच्या भावना
लोकांच्या भावना हल्ली अवघड जागेच्या गळवांसारख्या झाल्यात, उठता-बसता दुखतात. त्यात या दुखण्याला "माझं गळू मोठं; नव्हे, माझंच गळू मोठं!" अशा ज्वलंत आदर्शवादाची किनार आणि केवळ आपणच आपल्या आदर्शव…
लोकांच्या भावना हल्ली अवघड जागेच्या गळवांसारख्या झाल्यात, उठता-बसता दुखतात. त्यात या दुखण्याला "माझं गळू मोठं; नव्हे, माझंच गळू मोठं!" अशा ज्वलंत आदर्शवादाची किनार आणि केवळ आपणच आपल्या आदर्शवादाचे एकमेव तारणहार असल्याच्या जाज्वल्य अभिमानातून (आणि अस्वस्थतेमधुन) येणाऱ्या आवेशाला खत-पाणी घालत राहण्यासाठी प्रत्येक धोंडा स्वतःच्या गळ्यात बांधायची नाही तर पायावर मारून घेण्याची वेडी खोड! त्यामुळे, या गोंधळात दुर्लक्ष आणि अनुल्लेख या दोन कलांसोबत आता स्पष्टवक्तेपणा आणि विनोदही सार्वजनिक जीवनातून गायब झाला नाही म्हणजे मिळवलं!
Tags: