मला भावलेले वाजपेयी !
अटल बिहारी वाजपेयी ! या नावाच्या पुढं काही लिहायचं माझं धाडसच होत नाहीये आणि लिहावं तरी काय! ज्या मनुष्याचं आयुष्य, कर्तृत्त्व आणि ज्याची महानता आत्मतेजाने तळपणाऱ्या प्रखर सूर्यासारखी अक्षरश: धगधगते आहे, त्या मनुष्याबद्दल मी काय वेगळं लिहिणार?
अटल बिहारी वाजपेयी !
या नावाच्या पुढं काही लिहायचं माझं धाडसच होत नाहीये आणि लिहावं तरी काय! ज्या मनुष्याचं आयुष्य, कर्तृत्त्व आणि ज्याची महानता आत्मतेजाने तळपणाऱ्या प्रखर सूर्यासारखी अक्षरश: धगधगते आहे, त्या मनुष्याबद्दल मी काय वेगळं लिहिणार?
पण तरीसुद्धा अटलजींच्या कारकीर्दीस मानवंदना म्हणून, त्यांच्या स्मृतीवेलीवर मलाही एक छोटसं भावपुष्प चढवता यावं म्हणून, त्यांच्या सद्गतीसाठी छोटीशी प्रार्थना म्हणून आणि माझ्या मनात त्यांच्या बद्दल असलेला आदर आणि आपुलकीच्या भावनेला वाट मोकळी करून द्यावी म्हणून मोडके तोडके आणि अत्यंत बालिश का होईना चार शब्द हे लिहायचेच असं ठरवून माझी अल्प बुद्धिमत्ता स्वर्गीय श्री. अटल बिहारी वाजपेयींच्या कार्याचा, कर्तृत्वाचा आणि स्मृतींचा उचित सन्मान करू शकेल या आशेने मी माझ्या हातात अखेर लेखणी धरतो आहे.
अटल बिहारी वाजपेयी हे नाव माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कधी आलं हे मला नेमकं आठवत नाही, पण त्या व्यक्तीच्या प्रगाढ व्यक्तिमत्त्वाचा चंचुप्रवेश झाला तो “स्कूल चाले हम” या कवितेच्या निमित्ताने. जाहिरात, गाणं, कविता- ते जे काही होतं, मला आवडायचं. त्या गाण्यात सुरुवातीला आजोबांच्या वयाची एक व्यक्ती दिसते आणि ती व्यक्ती आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी आहे आहे, ही माझी आणि त्यांची माझ्या स्मरणातली पहिली ओळख.
मी ज्या वयाचा असताना “स्कूल चाले हम” दूरचित्रवाणीवर झळकू लागली त्या धडपडत्या वयात दुर्दैवानं राजकारण आणि संबंधित घडामोडींचा माझ्याशी शालांत परीक्षेत सामान्य ज्ञानाच्या पेपर मध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपलीकडे फारसा संबंध कधी आला नाही. त्यामुळं अटलजी सक्रीय राजकारणात असताना त्यांची कारकीर्द पहिली किंवा त्याच्याबद्दल मी वाचलं वगैरे म्हणणं अत्यंत हास्यास्पद आणि कमालीचं अतिशयोक्तीपूर्ण ठरेल.
"स्कूल चाले हम" नंतरची अटलजींच्या संदर्भातली माझी दुसरी आठवण म्हणजे, भाजपप्रणीत एन. डी. ए. तात्कालिक सार्वत्रिक निवडणुकीत हरल्यानंतर वाजपेयींनी दूरदर्शन वाहिनीवर केलेलं छोटंसं भाषण. त्या भाषणातून अटलजींनी देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल भारतीय जनतेचे अत्यंत विनम्रतेने आभार मानले होते. ते भाषण आजही माझ्या डोळ्यासमोर जसंच्या तसं आहे
त्यानंतर काळाच्या ओघात माझं राजकारणाबद्दल कुतूहल वाढलं. बातम्या, संपादकीय अशा गोष्टींमध्ये माझा रस वाढला पण त्या काळात वाजपेयी मात्र राजकारणाच्या सक्रीय पटलावरून काहीसे बाजूला झालेले. बातम्यांमध्ये त्यांची चर्चा होत असे ती बहुतांशी त्यांच्या तब्येतीबद्दल आणि त्यांना कोण्या मोठ्या व्यक्तीने त्यांना भेट दिली तर त्याबद्दल.
अटल बिहारींबद्दल माझं कुतूहल बळावलं ते याच दरम्यान. मग ते कुतूहल शमवण्यासाठी मी त्यांच्या भाषणाचे व्हिडीओज् पाहिले, वृत्तपात्रांच्या संग्रहित आवृत्त्यांमाध्ये छापून आलेल्या जुन्या बातम्या वाचल्या. राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तीचा सहवास कधी लाभला तर त्यांच्याशी अटलजींबद्दल चर्चा केली. या सगळ्या गोष्टींकडे वळून बघताना मला जाणवतं, की मला गवसत गेलेल्या माहितीच्या प्रत्येक तुकड्यागणिक वाजपेयींबद्दल माझ्या मनात असलेला आदर हा नेहमी वृद्धिंगतच होत गेला.
अटलजींमधल्या राजकारणी व्यक्तीमत्त्वानं जेवढं मला आकर्षित केलं तेवढंच आकर्षण मला त्यांच्या काव्यप्रतिभेबद्दलही वाटत आलंय. हिंदी साहित्याचा माझा फारसा अभ्यास नसल्यामुळे त्यांच्या कवितेचा तुलनात्मक अभ्यास मी फारसा करू शकलो नाही पण त्यांच्या सोप्या आणि अर्थवाही रचनांनी मला नेहमीच मोहवलं आहे.
त्यांच्या कैक कविता मला आत्ता आठवत आहेत त्यांपैकी एक म्हणजे दुध मे दरार पड़ गई-
भेद में अभेद खो गया. बंट गये शहीद, गीत कट गए, कलेजे में कटार दड़ गई. दूध में दरार पड़ गई.
भेद म्हणजे भेदभावत अभेद म्हणजे एकता हरवून गेली. त्याची ही रचना आजही दुर्दैवाने तितकीच खरी ठरते. याच रचनेमध्ये पुढे ते लिहितात-
खेतों में बारूदी गंध, टूट गये नानक के छंद सतलुज सहम उठी, व्यथित सी बितस्ता है. वसंत से बहार झड़ गई दूध में दरार पड़ गई.
प्रतिकुल परिस्थितीचा स्वीकार आणि ती अनुकूल परिस्थितीमध्ये बदलण्याचा अविचल विश्वास आणि क्षमता बाळगणारे अटलजी महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांना उद्देशून पुढची कविता लिहितात. प्रत्येक शब्द काळजीपूर्वक निवडणाऱ्या अटलजींची ही कविता वाचणाऱ्या व्यक्तीच्या थेट मनाला जाऊन भिडते. वाजपेयी लिहितात-
क्षमा करो बापू! तुम हमको, बचन भंग के हम अपराधी, राजघाट को किया अपावन, मंज़िल भूले, यात्रा आधी।
जयप्रकाश जी! रखो भरोसा, टूटे सपनों को जोड़ेंगे। चिताभस्म की चिंगारी से, अन्धकार के गढ़ तोड़ेंगे।
कौरव कौन, पांडव कौन या त्यांच्या आणखी एका कवितेत सद्य स्थितीचं वर्णन करताना वाजपेयी अत्यंत मोकळेपणाने लिहिते होतात की आजच्या घडीच्या राजकारणाची महाभारताशी तुलना करायची झाली तर कौरव कोण आणि पांडव कोण आसा प्रश्न पडेल कारण हा सगळा खेळ शकुनी मामाच्या स्वार्थी मनोवृत्तीचा वारसा लाभलेल्या लोकांनी चालवलेला आहे. कृष्णाशिवाय घडू पाहणाऱ्या या महाभारतात, वाजपेयी लिहितात, राजा कुणी होवो- “रंक को तो रोना है” या कवितेच्या ओळी आहेत-
कौरव कौन कौन पांडव, टेढ़ा सवाल है| दोनों ओर शकुनि का फैला कूटजाल है| धर्मराज ने छोड़ी नहीं जुए की लत है| हर पंचायत में पांचाली अपमानित है| बिना कृष्ण के आज महाभारत होना है, कोई राजा बने, रंक को तो रोना है|
दो अनुभूतीयां या रचनेमध्ये अटलजींनी निराशा आणि अशा या दोन अवस्थांमधून निर्माण होणाऱ्या वैफल्य आणि चैतन्य या दोन भावनांचं वर्ण शब्दामध्ये अत्यंत चपखलपणे केलेलं आहे. कवितेच्या ओळी आहेत-
-पहली अनुभूति
बेनकाब चेहरे हैं, दाग बड़े गहरे हैं टूटता तिलिस्म आज सच से भय खाता हूं | (तिलीस्म म्हणजे भ्रम किंवा एखादी भासमान गोष्ट) गीत नहीं गाता हूं
लगी कुछ ऐसी नज़र बिखरा शीशे सा शहर अपनों के मेले में मीत नहीं पाता हूं | (आपल्याच लोकांच्या गर्दीमध्ये कोणी मित्र दिसत नाही) गीत नहीं गाता हूं
पीठ मे छुरी सा चांद, राहू गया रेखा फांद मुक्ति के क्षणों में बार बार बंध जाता हूं गीत नहीं गाता हूं
-दूसरी अनुभूति
गीत नया गाता हूं टूटे हुए तारों से फूटे बासंती स्वर पत्थर की छाती मे उग आया नव अंकुर झरे सब पीले पात कोयल की कुहुक रात
प्राची मे अरुणिम की रेख देख पता हूं गीत नया गाता हूं
टूटे हुए सपनों की कौन सुने सिसकी अन्तर की चीर व्यथा पलकों पर ठिठकी हार नहीं मानूंगा, रार नहीं ठानूंगा,
काल के कपाल पे लिखता मिटाता हूं गीत नया गाता हूं
अटल बिहारींच्या काही कविता या प्रासंगिकही होत्या. भारताला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अगणित लोकांनी बलिदान दिलंय. ते स्वातंत्र्य तुम्हाला मिळणारच नाही, शिवाय कुठलेच कष्ट न करता फुकट मिळालेल्या स्वातंत्र्याच्या जोरावर भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या पाकिस्तानला वाजपेयी ठणकावून सांगतात-
एक नहीं, दो नहीं, करो बीसों समझौते पर स्वतंत्र भारत का मस्तक नहीं झुकेगा। अगणित बलिदानों से अर्जित यह स्वतंत्रता त्याग, तेज, तप, बल से रक्षित यह स्वतंत्रता प्राणों से भी प्रियतर यह स्वतंत्रता। . . धमकी, जेहाद के नारों से, हथियारों से कश्मीर कभी हथिया लोगे, यह मत समझो हमलों से, अत्याचारों से, संहारों से भारत का भाल झुका लोगे, यह मत समझो। जब तक गंगा की धार, सिंधु में ज्वार अग्नि में जलन, सूर्य में तपन शेष स्वातंत्र्य समर की वेदी पर अर्पित होंगे अगणित जीवन, यौवन अशेष।
अमेरिका क्या संसार भले ही हो विरुद्ध कश्मीर पर भारत का ध्वज नहीं झुकेगा, एक नहीं, दो नहीं, करो बीसों समझौते पर स्वतंत्र भारत का मस्तक नहीं झुकेगा।
त्यांच्या अनेक कविता आशादायी आणि स्फूर्तीदायी असत. कदम मिलके चालना होगा या कवितेमध्ये ते लिहितात,
बाधाएं आती हैं आएं घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा. कदम मिलाकर चलना होगा. . . कुछ कांटों से सज्जित जीवन, प्रखर प्यार से वंचित यौवन, नीरवता से मुखरित मधुबन, परहित अर्पित अपना तन-मन, जीवन को शत-शत आहुति में, जलना होगा, गलना होगा. क़दम मिलाकर चलना होगा.
अटलजी आणि त्यांच्या कवितांबद्दल लिहिण्यासारखं पुष्कळ आहे. अभ्यासाचा तो एक स्वतंत्र विषय व्हावा एवढं. तसं ते कुठल्याही कवीच्या बाबतीत असतंच सहसा. पण अटलजीं बद्दल हे विशेषकरून सांगण्यापाठीमागचं कारण असं कवीमनाची संवेदनशीलता लाभलेली व्यक्ती राजकारणासारख्या क्षेत्रात दिवसाचे चोवीस तास, आठवड्याचे सातही दिवस आणि ते ही आयुष्यभारासाठी कार्यरत होती.
यमकाला यमक जुळवून कविता करायला फार प्रतिभा लागते अशातला भाग नाही. ‘वेडे मन, अधीर मन’ असं काही लिहायला किंवा उगाच संदिग्ध काही तरी ज्याचा अर्थ कवीला स्वत:ला सुद्धा सांगता येणार नाही असं काही खरडायला फार बुद्धिमत्ता लागते असंही नाही. प्रतिभा, बुद्धिमत्ता लागते ती स्वत:च्याच आयुष्याकडे अत्यंत तटस्थपणे पाहून, निरक्षीरविवेकाने त्यातले योग्य ते मौक्तिक उचलून त्याचा गोफ शब्दात बांधायला. ज्यांना ही तपस्या जमली केवळ तेच लोक दर्जात्मक साहित्य निर्माण करू शकले. अटलजी हे त्या व्यक्तींपैकी एक होते असं मला वाटतं, आणि म्हणून अटलजींच्या कवितांचं विशेष कौतुक.
कवीला धर्म असू शकतो, जात असू शकते, त्याचा स्वत:चा एखादा राजकीय कल असू शकतो, पण तो कवीला. काव्याला नाही. खरं आणि दर्जात्मक काव्य हे सत्त्वशुद्ध असतं, आणि ती शुद्धता टिकवायला अर्थातच कमालीचा तटस्थपणा म्हणजेच निर्मिर्तीपासून स्वत:ला, स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाला विलग करण्याची क्षमाला असावी लागते.
मला अटलजींचं कौतुक वाटतं ते याचसाठी. देशाच्या सर्वोच्च कार्यकारी पदावर पोहोचलेली व्यक्ती, आपल्या पंतप्रधानपदाचा अहं बाजूला सारून सर्वसामान्यांच्या भावविश्वावर एक कवी म्हणूनही अधिराज्य गाजवू शकते तर त्या व्यक्तीच्या ठायी कोण दर्जाची असामान्यता असेल याचा आपण केवळ विचारच करू शकतो.
त्यांच्या या निगर्वी असामान्यतेनंच सर्वांच्या मनामध्ये आढळ स्थान निर्माण केलं असं मला प्रखरतेनं वाटतं.
माझ्या उण्या-पुऱ्या चोवीस वर्षांच्या आयुष्यात मी भारताच्या बहुतांशी पंतप्रधानांबद्दल कमी अधिक वाचन केलं, माहिती मिळवली; पण पंतप्रधानपदाचंअवडंबर ओलांडून एक माणूस म्हणून आपलेपणा वाटणारं वाजपेयींचं जे स्थान माझ्या मनात निर्माण झालं ते मात्र त्या पदावर बसलेली कोणतीच व्यक्ती निर्माण करू शकली नाही, आणि हे मी मनापासून लिहितोय, निमित्तमात्र म्हणून नाही.
अटलजींच्याच ओळींनी मला या लेखप्रपंचाचा शेवट करायचा आहे, पण तत्पूर्वी अटलजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. एक व्यक्ती म्हणून, राजकारणातली सक्रीय असामी म्हणून आणि देशाच्या शिखरपदाची गरिमा वृद्धिंगत करणारा एक (कदाचित एकमेव) अजातशत्रु, आदर्श आणि कणखर नेता म्हणून अटलजींनी देशासाठी जे अमुल्य योगदान दिलं त्यासाठी त्यांना शतश: नमन आणि ‘असा नेता होणे नाही’ हे आपण म्हणतो खरं, पण असा एक नाही तर असे दहा नेते आपल्या भूमीस लाभोत ही परमेशाच्या चरणी प्रार्थना.
अटलजींच्याच शब्दांत अटलजींच्या चरणी ही माझी छोटीशी भावसुमनांजली-
मैं जी भर जिया, मैं मन से मरूं, लौटकर आऊँगा, कूच से क्यों डरूं?
-सौरभ राघवेंद्र.