पुस्तक दिन
पुस्तक दिनानिमित्त आज बऱ्याच जणांनी बरंच काही लिहिलं. ते वाचून आपणही काही तरी लिहावं असा मोह माझ्याही मनात उत्पन्न झाला. माझ्या आयुष्यात वाचनाचा श्रीगणेशा मी खूप लहान असतानाच झाला. माझ्या बाब…
पुस्तक दिनानिमित्त आज बऱ्याच जणांनी बरंच काही लिहिलं. ते वाचून आपणही काही तरी लिहावं असा मोह माझ्याही मनात उत्पन्न झाला. माझ्या आयुष्यात वाचनाचा श्रीगणेशा मी खूप लहान असतानाच झाला. माझ्या बाबांना वाचनाची आवड असल्यानं आमच्या घरात पुस्तकं वेगळी अशी आणावी लागली नाहीत किंवा माझ्यावर वेगळे वाचनाचे संस्कारही करावे लागले नाहीत. मी पुस्तकांसोबत मोठा झालो, आणि झालोच असेन जर, तर पुस्तकांमुळे मोठा झालो.
माझ्या वाचनप्रवासाविषयी मला सविस्तर लिहायचं आहे, योग्य वेळ आली की मी लिहीनही, पण तूर्तास, आज बसल्या बसल्या मी आयपॅडवर एक पुस्तक चाळत होतो, तेंव्हा त्यातला एक परिच्छेद मला मोठा ईनसाइटफुल वाटला, तो परिच्छेद मी शेअर करतोय. एका जाणत्या व्यक्तीच्या स्नेह्याच्या, तिशीच्या आतल्या तीन मुलींचं पंधराच दिवसात लागोपाठ निधन झालं होतं. त्या व्यक्तीला लिहिलेल्या सांत्वनपर पत्रातला हा परिच्छेद आहे. तो असा-
It is like this: one never rejects joy; it is so strong, so vibrant, so alive, so creative, that one never questions it, discards it, runs away from it; it consumes one and carries one in the movement. In that moment of happiness there is no question of getting rid of it, or wanting to find out the cause of joy; one lives in it. Now, in the same way, if I may suggest, do the same thing with sorrow. Naturally, when one escapes from it or one seeks a remedy in innumerable beliefs, or in people, the fullness amd richness of sorrow is diminished; and the one who knows to suffer greatly with intelligence, not with the acceptance or resignation, knows the real ecstasy of living.