स्टार्टअप
मित्र: हे ब्रो ! लॉंग टाईम नो सी मॅन !
मित्र: हे ब्रो ! लॉंग टाईम नो सी मॅन !
मी: हो, हो, बरेच दिवस झाले, भेटलो नाही आपण.
मित्र: येस, येस तेच ! सो, व्हाट्स अप ? काय चाललंय सध्या ?
मी: काही नाही बघ.. रुटीन सुरू आहे.
मित्र: ओके ओके! कूल कूल. तुझे स्टार्टअप्स काय म्हणतात ?
मी: स्टार्टअप्स? छान चालू..
मित्र (माझं बोलणं मध्येच तोडून): येस येस. ब्रो, इव्हन आय स्टार्टेड अप !
मी: अरे वा!
मित्र: आय नो राईट! (लहान असताना लाईट गेल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात हरणाची आकृती दाखवायला आपण हस्तमुद्रा करायचो तसं काहीसं करून) यो मॅन! हसल फॉर लाईफ!
मी: हो, हो! सो, काय करतोयस?
मित्र: स्टार्ट अप ब्रो!
मी: (पेशंटली) अरे हो, पण कशात? काय करतोयस नक्की?
मित्र: येस तेच, स्टार्टअप डिजिटल, इंटरनेट यु नो- मार्केटिंग थिंग्स!
मी: ओह ! डिजिटल मार्केटिंग ?
मित्र: यो मॅन!
मी: किती जणांची टीम आहे?
मित्र: फोर पीपल मॅन! आम्ही चार (हे चार गरज नसताना उगाच ऍक्सेन्ट मध्ये) चार लोक आहोत.
(चौघांची टीम आणि चार फाउंडर मेंबर्सची टीम असणं यात जमीन-अस्मानाचा फरक असतो. हे त्याच्या रेबॅनच्या गॉगलआड लुकलूकणारऱ्या डोळ्यांना दिसतंय का हे मला कळत नव्हतं!)
मी: क्या बात है! चौघं फाउंडर्स! कौतुक आहे! टीमवर्क छान असेल मग! कोण लिड करतंय?
मित्र: वी ऑल लिड मॅन. आमचं ठरलंय. सोमवारी मी लीडर असतो, मंगळवारी आशुतोष, बुधवारी अभिषेक आणि गुरुवारी निमिषा! मग फ्रायडे, सॅटरडे आणि संडे सुट्टी!
मी: काय!! तीन दिवस विकेंड?
मित्र: यो मॅन. प्रॉडकटीव्हीटी वाढते यु नो! तूझं कसं असतं विकेंडचं?
मी: (हसावं की रडावं या संभ्रमात) मी विकेन्ड्सना पण काम करतो.
मित्र: ऑ! हाऊ सॅड! जॉईन अस ब्रो! सुट्टी घे तीन दिवस मस्त!
मी: सुट्टी घ्यायला जॉईन करू? बर्र! आणि कम्पेनसेशन किती देणार? (उगाचच चौकशी गम्मत म्हणून!)
मित्र: कम्पेनसेशन? नो मॅन! यु गॉटा हसल राईट? दॅट्स व्हॉट स्टार्ट अप इस अबाउट!
मी: येस, व्हाय नॉट! मग तुमचं हे रोटेटिंग लिडरशिपचं स्ट्रक्चर कसं काम करतंय?
मित्र: प्रोज अँड कॉन्स ब्रो! प्रोज अँड कॉन्स! सोमवारी मी घेतलेला डिसीजन बुधवारी अभिषेक रिव्हर्ट करतो. निमिषा सगळे डिसीजन्स चेंज करते गुरुवारी. मग तीन दिवस पार्टी यो!
मी: अरे पार्टीचं ठीक आहे! पण असे डिसीजन घेतले तर सस्टेन कसं होईल तुमचं व्हेंचर?
मित्र: नथिंग इज सर्टन मॅन. दॅट्स व्हाय यु गॉट टू हसल.
(यु गॉट टू हसल म्हणे! मला हसायलाच येत होतं)
मी: सर्टन नव्हे रे मित्रा, सस्टेन, स स्टे न!
मित्र: दॅट्स दॅट रे!
मी: दॅट्स दॅट का! बरं बाबा, असेल तसंच. (आमच्याच शाळेत वेगळं शिकवलं असेल) बाकी! आज भेट घ्यायची इच्छा कशी झाली?
मित्र: स्पॉट ऑन ब्रो! स्पॉट ऑन! वॉज गोना टेल या! आम्ही इन्व्हेस्टर्स शोधतोय.
मी: बरं मग?
मित्र: वॉना इन्व्हेस्ट इन अस? वी गॉट अ फंटास्टीक टीम ब्रो- मी, निमिषा, अभिषेक आणि आशुतोष.
(निमिषा आणि त्याचं बहुधा सुरू असावं काही तरी अशी शंका अली मला. नाही तर डिसीजन मेकिंगचे वार लावले होते त्याची ऑर्डर चुकवली नसती त्याने. आणि हा मगाशी मला लॉंग विकेन्ड्स साठी टीम जॉईन कर म्हणत होता, आता थेट इन्व्हेस्ट कर म्हणतोय! कुठल्या ग्रहावर बिझनेस शिकून आलाय देव जाणे! पण मी एक 'गूड लिसनर' आहे शिवाय बाकी काही दिलं न दिलं, आपण होऊन कोणी येतं आहे म्हटल्यावर वेळ देऊच शकतो.)
मी: बरं बरं! काय प्लॅन आहे तुमचा? प्लॅन ऍज इन बिझनेस प्लॅन?
(म्हटलं क्लिअर करावं नाही तर विकेंडचा प्लॅन संगायचा..)
मित्र: ओह! बिझनेस प्लॅन!! फॉर या मोमेंट मला वाटलं, विकेंडचा प्लॅन विचारतो आहेस. सो, येस, विकेंडला मी, निमिषा, तिची फ्रेंड आणि तिच्या फ्रेंडचा बॉयफ्रेंड लोणावळ्याला जातोय. बाय द वे, निमिषा, यु नो हर राईट? वी इन रिलेशनशिप नाऊ. (त्याने डोळा मारून सांगितलं.)
(माझे सगळेच अंदाज खरे ठरले. बिझनेस प्लॅन असं म्हणूनही शेवटी त्यानं विकेंडचाच प्लॅन सांगितला, निमिषा आणि तो एकत्रही होते आणि आता हे सांगताना त्याने डोळा मारला त्यावरून ते लोणावळ्याला का जाणार आहेत याचाही मला अंदाज आला; पण भलत्या गोष्टींच्या तपशिलात जायला नको उगाच म्हणून,)
मी: अरे, मित्रा बिझनेस प्लॅन रे... बिझनेस प्लॅनबद्दल विचारतोय मी !
मित्र: या या, आय वॉज गोना कम टू इट. सो सी, ईट्स लाईक वी डोन्ट बिलिव्ह इन बिझनेस प्लॅन्स यो.
(पण विकेंडच्या प्लॅन वर बरा विश्वास आहे याचा!)
मी: म्हणजे? बिझनेस प्लॅन वर विश्वास नाही, मग काय देवावर वगैरे विश्वास ठेवून धंदा करता का?
(माझ्या संयमाची शीर फडफडत होती)
मित्र: हा हा, नो ब्रो, वी डोन्ट बिलिव्ह इन गॉड आयदर. आणि धंदा काय म्हणतोस! सो डाऊनमार्केट! सो येस, आय मिन, प्लॅन मिन्स पॅटर्न, पॅटर्न मिन्स स्टेटस क्वो! वि आर डिसरप्टर्स ब्रो. नो प्लॅन इज माय प्लॅन.
(नो प्लॅन इज माय प्लॅन म्हणे! पण असतात काही असे इंप्रोव्हाइज करणारे. म्हटलं नारळ वाजवून पहावा अजून थोडा वेळ. खरंच पाणी आहे की गॉटा गॉटा वाला नुसता गोटाच आहे ते तरी कळेल)
मी: सो, मी इन्व्हेस्ट नेमकं कशात करू? बाकीचे इन्व्हेस्टर्स गाठलेत का तुम्ही? ते काय म्हणाले?
मित्र: येस. वी मेट. ते असंच म्हणाले.. नक्की कशात इन्व्हेस्ट करू!? कमॉन मॅन! इन्व्हेस्ट इन अस! इन्व्हेस्ट इन अवर रिस्क टेकिंग अटिट्युड. वी आर नेक्स्ट जनरेशन यो. वी हसल मॅन.
(अशी बडबड केली तर कोणीही 'हसल' असं सांगावसं वाटलं, पण स्टार्टअप फिव्हरनं सरभरलेलं त्याचं डोकं पाहून उगाच सहानुभूती वाटली मला त्याच्याबद्दल.)
मी: अरे, मित्रा! तुमच्याकडे पाहून, तुमचा अटीट्युड पाहून जरी इन्व्हेस्ट केलं, तरी तुम्ही कशाकडे बघून काम करणार हे आम्हाला माहिती नको का?
(या वाक्याला त्याने पहिल्यांदाच गॉगल काढला. त्याच्या डोळयांत भलं मोठं शून्य बघून मला गम्मत वाटली.)
मित्र: म्हणजे?
(स्वारी मराठी वर अली की समजावं, यांचं उसनं अवसान संपून गेलंय.)
मी: अरे, म्हणजे, तुम्ही काय करणार आहात, तुम्ही कसं करणार आहात! तुमचे कस्टमर्स कोण आहेत, तुमचं स्वतःचं मार्केटिंग कसं करणार आहात? आणि जोपर्यंत फंड्स मिळत नाहीत तोपर्यंत कसं काम करणार आहात? फंड्स मिळाले की त्याची युटिलिटी कशी असेल आणि त्यावर इन्व्हेस्टर्सना रिटर्न कसा आणि किती मिळेल? तुम्ही डिजिटल मार्केटिंग म्हणता, पण मग नेमकं कोणाचं मार्केटिंग? कस करणार ते आणि तुम्हाला त्यात काही प्रायर एक्सपिरिअन्स आहे का? टॅलेंट अक्विझिशन स्ट्रॅटेजी काय आहे तुमची? अशा पुष्कळ गोष्टी असतात रे. त्या फिगर आउट केल्यात का?
(माझ्या बोलण्यातलं त्याला काय कळलं देव जाणे, त्याने गॉगल चढवला.)
मित्र: येस मॅन! वी आर फिगरींग आऊट, ऑल राईट! स्टॉप इन्व्हेस्टीगेटिंग.
(इन्व्हेस्टर वर चिडणारा पहिलाच मनुष्य पहिला मी. मला गम्मत वाटली.)
मी: अरे, इन्व्हेस्टिगेट कोण करतंय? मी विचारतोय की डू यु वॉन्ट मी टू इन्व्हेस्ट इन युअर प्रोसेस ऑफ फिगरींग आऊट?
(म्हटलं इंग्लिश मध्ये विचारू, मग कळेल; पण हा खरं तर ट्रिक क्वेश्चन होता. कोणताही शहाणा मनुष्य याचं उत्तर नाही असंच देईल. पण कुणाचं काय तर कुणाचं..)
मित्र: यो मॅन! नाऊ वि आर टॉकिंग. फिगरींग आऊट. बरोबर म्हटलंस. दॅट्स अवर प्लॅन. राईट. लाईफ इज अबाउट हसलिंग आणि फिगरींग आऊट.
(त्याचं ते हसलिंग हसलिंग ऐकून एव्हाना बारा लिंगं पण हसायला लागली असतील असं वाटलं मला)
मी: अरे पण मला काय आउटपुट त्यातून ? असं थोडी कोण इन्व्हेस्ट करतं?
(मी इथे इन्व्हेस्ट करणार आणि हे लोणावळ्यात जाऊन वेगळंच काही तरी फिगर आउट करणार हे सांगायला बिझनेसमनच असायला हवं असं नाही)
मित्र: आऊटपुट? नो मॅन! यु डू इट फॉर स्पिरिट!
(अशी इन्व्हेस्टमेंट केली तर स्पिरिट प्यायची वेळ येईल इन्व्हेस्टरच्या आयुष्यात)
मी: नाही रे! मी इनव्हेस्ट करतो हे तुला कोणी सांगितलं माहिती नाही, पण सध्या तरी अवघड वाटतं मला.
मित्र: व्हाय ड्युड! कमॉन! तुझ्यामध्ये कोणी तरी इन्व्हेस्ट केलं असेलंच की!!
(गोष्टी पर्सनल लेव्हल वर आणल्या की त्या डोक्यात जातात माझ्या)
मी: नोप.
(मी कोणाही कडून सुट्टा रुपयाही न घेता सुरू केलं सगळं, पण ती गीता याच्यापुढे वाचून गाढव माझंच होणार! आणि इन्व्हेस्ट म्हणाल तर आई-बाबांनी मला पेशंटली वेळ दिला, हवं ते करण्याची मोकळीक दिली ही एवढीच माझ्यावर कोणीतरी केलेली गुंतवणूक, आणि पुरते तेवढीच बऱ्याचदा; पण ह्याचं गांभीर्य त्याला थोडी कळणार!)
मित्र: मग! हाऊ शल वी स्टार्ट!
(त्याने परत गॉगल काढला)
मी: फिगर इट आऊट. हसल.
(मी गालातल्या गालात हसत होतो, पण ते त्याला दिसलं नसावं)
मित्र: राईट मॅन. आय विल. नाईस टॉकिंग, बाय!
मी: बाय!
-सौरभ राघवेंद्र.