छे छे ! टायपो छे !
निमित्त आहे, आज
निमित्त आहे, आज
सकाळीच लिहिलेल्या “ओढ पिंपळाची” या “पिंपळ” नावाच्या चित्रपटावरच्या लेखामध्ये
नजरेतून सुटलेल्या शुद्धलेखनाच्या चुकांचं.
लिहिताना, भाषा
शुद्धी आणि आणि शुद्ध भाषा या दोन गोष्टींबद्दल जेवढा आग्रही मी असतो, तेवढ्याच तीव्रतेचा
आळशी मी, मी स्वत: केलेल्या लिखाणाचं पुन:परीक्षण करण्याबाबत आसतो. त्यामुळं कित्येक
वेळा असं होतं की लिखाणात राहून गेलेल्या चुका जेव्हा मी लेख पुन्हा वाचायला घेतो,
तेंव्हाच नजरेस पडतात आणि मग अशा क्षुल्लक चुका असणारा लेख माझ्या वाचकमित्र-मैत्रिणींनी
वाचला या विचारांनं मला खूप ओशाळून जायला होतं. एरवी मग मी त्या चुका लक्षात येतील
तशा दुरुस्त करतो, पण मग आज वाटलं या चुकांबद्दल थोडं लिहिलं जावं.
शुद्धलेखनाच्या
चुकांच्या बाबतीत एक गोष्ट मी नेहमी अनुभवतो. जेंव्हा जेंव्हा मी हातात पेन घेऊन
कागदावर लिखाण करतो तेंव्हा माझ्या लिखाणात शुद्धलेखनाची एकही चूक वाचकाला शोधून
सापडणार नाही, पण जेंव्हा मी तेच लिखाण समोर ठेवून माझ्या लॅपटॉपमध्ये टाईप करायला
घेतो, तेंव्हा मात्र मुक्त हस्ताने उधळण वगैरे म्हणावी अशा प्रकारे या चुकांची खैरात
होऊ लागते आणि यातल्या कित्येक चुकांना जबाबदार हे मराठीमध्ये लिखाण करण्यासाठी
इंग्रजी कीबोर्डचा वापर हे एकमेव कारण असतं.
“ओढ पिंपळाची” या
लेखाच्या ओपनिंग लाईन मध्येच मला माझ्या लेखाच्या पहिल्या रिडिंग मध्ये पहिली चूक आढळली.
मला लिहायचं होतं “कर्ता” आणि लिहिलं गेलं “करता.” पुढे लिहायचं होतं, “तिचं” लिहिलं गेलं “तिच.”
लिहायचं होतं “लक्षात” आणि लिहलं गेलं “लक्ष्यात.” आणि सगळ्यात मोठी मौज- लिहायचं
होतं “पिंपळ” आणि लिहिलं होतं “पिंपल !” आता कोणा व्यक्तीला “ओढ पिंपलाची” असते हे
तो ट्रान्सलिटरेशनचा अल्गोरिदमच जाणे !
अशा चुकांना बहार
आलेला “ओढ पिंपळाची” हा काही माझा पहिलाच लेख नव्हे. या आधी लिहिलेल्या जवळ जवळ
सगळ्याच लेखांमध्ये अशा चुका दुरुस्त करण्यासाठी कित्येक वेळेला मला डोळ्यात तेल
घालावं लागलं आहे.
पण या सगळ्याला
सोनेरी किनार- सिल्व्हर लाईनिंगला सोनेरी किनार का म्हणतात हे भाषाप्रभूच जाणे !
असो. तर या सगळ्याला सोनेरी किनार अशी, की या अशा टाइपिंगची मला एवढी सवय झाली आहे
की मला चूक होण्याआधीच ती कुठे होणार आहे याचा अंदाज येतो.
आता उदाहरणार्थ-
बोलीभाषेत अनेक वेळेला क्रियापदाच्या शेवटी येणारी मात्रा उच्चारली जात
नाही. उदाहरणार्थ “असे कार्य केले गेले” हे वाक्य बोलताना आपण “असं कार्य केलं गेलं.”
अशा पद्धतीमध्ये बोललं जातं. (याठिकाणी सुद्धा बोलले जाते याच्या ऐवजी, बोललं जातं
असं लिहिलं आहे.) याशिवाय इथे-इथं, तिथे-तिथं, कुठे-कुठं या पद्धतीचे शब्द
लिहिताना, शेवटच्या अक्षरावर येणारा अनुस्वार नेहमी घोळ घालतो. मग अशावेळी तो
अनुस्वार आणण्यासाठी अकारण कसरत करत बसावी लागते.
काही शब्द-
उदाहरणार्थ लॅपटॉप, ऑक्शन, अॅक्सीडेंट, क्राफ्टमन्सशिप
वगैरे तर एका फटक्यात लिहिणं तर जवळ जवळ अशक्य होऊन बसतं. हे शब्द एडीट न करता लिहिले
तर अनुक्रमे असे दिसतात: लाप्तोप (लॅपटॉप), ओक्षण (ऑक्शन), अक्सिदेंत (अॅक्सीडेंट),
क्रफ्त्स्मान्शीप (क्राफ्टमन्सशिप) !!
असो.
मी मराठीमध्ये
लिखाण करण्यासाठी गुगलचा इंडिक कीबोर्ड वापरतो. मोबाईलवरती टाईप करताना या चुका
त्या मानाने कमी होतात, कारण तो कीबोर्ड कुठे तरी लिहिणाऱ्याच्या सवयीशी जुळवून
घेतो आणि कष्ट वाचवतो, पण जर लिहिणाराच मुळात या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल अनभिज्ञ
असेल तर मग व्हॉट्सअॅप वरच्या एखाद्या मेसेज मध्ये अनभिज्ञ हा शब्द अनभि”ञ” असा
होउन येतो. याहूनही वाईट म्हणजे कित्येक मेसेजेस मध्ये तर “त्र” हे अक्षर मी “ञ” या अक्षराने सर्रास रिप्लेस
झालेलं पाहिलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग-
"करणे" ऐवजी "करने", "अक्षांश" ऐवजी "अक्शांश", "षटकोन" ऐवजी "शटकोन" हे असं अशुद्ध उपायोजन
रूढ होण्यासठी फारसा वेळ लागेल असं मला वाटत नाही. “प्रतिष्ठान” या शब्दाच्या “प्रतिष्ठाण”
या अपभ्रंशामागे याच डिजिटल क्रांतीचा हातभार आहे अशी मला दाट शंका आहे.
लिखाणामध्ये
बोलीभाषेचा उपयोग करणं ही वेगळी गोष्ट आहे. माझा एक मित्र “अभ्युदय बॅंक” हा शब्द “अभुदे
ब्याक” असा उच्चारतो. उद्या जर माझ्या लेखात त्याचं पात्र मला उभं करायचं असेल तर त्याच्या तोंडी “अभ्युदय
बॅंक” शोभून दिसणार नाही. “अभुदे ब्याक” हे शब्द तिथे आल्याशिवाय त्या पत्राचं
कल्पनाचित्र आपल्या डोळ्यासमोर उभंच राहणार नाही; पण त्याहीपुढे जाऊन “अभुदे ब्याक” लिहिताना
सुद्धा मला हा शब्दसमूह “अ-भु-दे- ब्या-क” असाच लिहावा लागणार. त्यातला एखाद्या ऱ्हस्वाचा
दीर्घ झाला किंवा ब्य ऐवजी बय असा झाला तर आणि “अभुदे ब्याक” ऐवजी “अभूदे बयाक” असं
लिहिलं गेलं तर शुद्धलेखनाची यापेक्षा गंभीर चूक नाही, आणि त्यापाठचं कारणही तितकंच रास्त आहे.
बोलीभाषा कधीच
शुद्ध किंवा अशुद्ध नसते. बोलीभाषा फक्त असते. इंग्रजी भाषेच्या विपरीत आपण मराठी
भाषा तशीच लिहितो जसा आपण तिचा उच्चार करतो. उदाहरणार्थ, इंग्रजी भाषेत न्यूमॅटिक
या शब्दाच्या स्पेलिंग मध्ये सुरवातीला “पी” हे अक्षर येतं, पण त्याचा उच्चार होत
नाही, पण जेंव्हा आपण हा शब्द मराठी संवादाच्या परिभाषेत उच्चारतो, जसं, “अरे मित्रा
! ते न्यूमॅटिक प्रेशर किती ते सांग मला जरा..” तेंव्हा न्यूमॅटिक हा शब्द आपण प्न्यूमॅटिक
असा लिहित नाही. जसा उच्चार होतो तसंच लिखाण होतं. अशी हजारो उदाहरणं आपण देऊ शकतो.
आता “बऱ्याच” हा शब्द घ्या. या शब्दातला “ऱ्या” या अक्षरसमूहाला त्याचं त्याचं असं स्वतंत्र
अस्तित्त्व आहे. पण डिजिटल क्रांती त्याचं हे स्वातंत्र्य हिरावून घेते मग "बऱ्याच" या
शब्दाचं "बर्याच" या शब्दात रुपांतर होतं आणि व्हॉट्सअॅप सारखी माध्यमं तर अशा
चुकांची अक्षरशः खाण आहेत.
(याठिकाणी सुद्धा “माध्यम” या शब्दावर अनुस्वार आहे
म्हणून या वाक्याला अर्थ उरतो. तो अनुस्वार काढला, तर माध्यम हा शब्द एकवचनी होतो,
आणि वाक्याची अर्थपूर्णता लयाला जाते !)
भाषा कशी बोलावी
हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण ती लिहावी कशी याला मात्र नियम आहेत आणि ते
असायला हवेतच. बोलीभाषा ही त्या त्या क्षेत्रातल्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि एकूणच
सांस्कृतिक जीवनाचा परिपाक असते, पण तेच जेंव्हा लिखापढीमध्ये उतरू पाहतं, तेंव्हा
त्याला कुठे तरी काहीशे वर्षांच्या उत्क्रांतीचा इतिहास असलेल्या व्याकरण आणि लेखनाच्या नियमावलीत बसवूनच आणवं लागतं अन्यथा
ते लिखाण एक तर दुर्बोध तरी होतं, किंवा त्यातून काहीच अर्थबोध होत नाही.
वरवर पाहिलं तर
या गोष्टी खूप सध्या, सोप्या, सरळ आणि छोट्या वाटतात, पण बोलीभाषेचं उच्चारसौन्दर्य
टिकवण्यासाठी शुद्धलेखनाच्या आग्रहाचा कुठे तरी हातभार लागतो, हे सुद्धा तेवढंच खरं.
उदाहरणार्थ- एक बदक, अनेक बदकं हे वाचताना आपण आपल्या नकळत “बदकं” यातला क थोडा
लांबवतोच. जेंव्हा आपण असं, कसं, तसं वगैरे अनुस्वाराने शेवट होणारे शब्द वाचतो
तेंव्हा साहजिकच तो ‘स’ लांबवतो. स् – स – सं ही तीन अक्षरं उच्चारतांना करावयाचा
फरक हा लेखनाचे नियम पाळले तरच तो सहजपणे वाचकाच्या लक्षात येतो, अन्यथा त्याला
कसरत करत तो जुळवून आणावा लागतो.
त्यामुळे ह्या अशा चुकांच्या बाबतीत आपण नेहमीच सजग असयला
हवं आणि ही सजगता दुसऱ्याची चूक दाखवण्यासाठी नव्हे तर स्वत:च्या चुका
सुधरवण्यासाठी असायला हवी. त्यासाठी आवश्यक ज्ञान आणि संस्कार विद्यार्थ्यांना
पहिल्यापासूनच उपलब्ध करून दिले गेले पाहिजेत आणि ट्रान्सलिटरेशन करणारे अल्गोरिदमही शुद्धलेखनाच्या नियमांना अधिकाधिक धरून चालणारे बनवायला हवेत. आपली तंत्रकुशलता
पाहता ही मागणी अगदीच हास्यास्पद आहे असं मला अजिबातच वाटत नाही.
आणि यापुढे जाऊन, भाषा
टिकवायची म्हणजे तरी वेगळं असं काय करायचं काय असतं ?
सतत वाहता आणि वळणागणिक बदलत जाणारा
सांस्कृतिक प्रवाह आपल्याला काळाच्या कुठल्या टप्प्यावर आणि बदलाच्या कुठल्या बेटावर नेऊन सोडेल हे आपण संगु
शकतो का ? सभोवताल बदलला, की बोलीभाषा बदलते. भाषेचं संवर्धन करायचं म्हणजे भाषेला
प्रवाहाविपरीत मगरमिठी मारून बसायचं असा तर नक्कीच होत नाही ना ? त्यामुळे सांस्कृतिक
प्रवाहामध्ये विहार करणाऱ्या भाषेच्या नौकेला एकसंध धरून ठेवणाऱ्या नियमांचं थोडं
कठोरपणे पालन झालं तरी आपण अर्धी लढाई जिंकली असं आपण म्हणू शकतो,होना ?
नाही तर मग आपल्या
चुकांना छे छे, ये तो टायपो छे ! असं म्हणत जस्टीफाय करत बसलो, तर आपल्या भाषेचं
स्वरूप केंव्हा बदलून जाईल, हे आपल्याला सुद्धा कळणार नाही !!
-सौरभ राघवेंद्र.
<!--[if gte mso 9]>
<![endif]--><!--[if gte mso 9]>
Normal
0
false
false
false
EN-IN
X-NONE
MR
<![endif]--><!--[if gte mso 9]>
<![endif]--><!--[if gte mso 10]>
/* Style Definitions */
table.MsoNormalTable
{mso-style-name:"Table Normal";
mso-tstyle-rowband-size:0;
mso-tstyle-colband-size:0;
mso-style-noshow:yes;
mso-style-priority:99;
mso-style-parent:"";
mso-padding-alt:0cm 5.4pt 0cm 5.4pt;
mso-para-margin-top:0cm;
mso-para-margin-right:0cm;
mso-para-margin-bottom:8.0pt;
mso-para-margin-left:0cm;
line-height:107%;
mso-pagination:widow-orphan;
font-size:11.0pt;
font-family:"Calibri",sans-serif;
mso-ascii-font-family:Calibri;
mso-ascii-theme-font:minor-latin;
mso-hansi-font-family:Calibri;
mso-hansi-theme-font:minor-latin;
mso-fareast-language:EN-US;
mso-bidi-language:AR-SA;}
<![endif]-->