तळजाई
तळजाईवर 'विकास'कामांनी उच्छाद मांडल्यापासून माझं तळजाई वर जाणं बरंच कमी झालंय, नाही तर पूर्वी अलमोस्ट रोज जात असे मी.
तळजाईवर 'विकास'कामांनी उच्छाद मांडल्यापासून माझं तळजाई वर जाणं बरंच कमी झालंय, नाही तर पूर्वी अलमोस्ट रोज जात असे मी.
असंच एकदा चालून चालून थोडं दमल्यावर मी बसलो होतो एका बाकावर. समोरून एक कपल जात होतं. मुलगा आणि मुलगी- दोघेही कॉलेजमध्ये शिकणारे वाटले. त्यांचा संवाद कानावर पडला. मुलगी तिच्या आयुष्याची स्टोरी सांगत होती. ती म्हणाली , 'मी पहिल्यांदा पुण्यात आली ना तेंव्हा मे सहा वर्षांची होती.'
त्या मुलाच्या चेहऱ्यावर आठ्या, त्या आठयांमध्ये पुणे. मुलगा म्हणाला, 'अगं मी आली नाही गं, मी आले.'
त्या मुलीला बहुधा तिच्या लाईफच्या ष्टोरीत ग्रामॅटीकल मिस्टेक काढणं खटकलं असावं. ती म्हणाली, 'मी आले?'
समस्त पुणेकारांच्या वतीनं आपण हिला शहाणं केल्याच्या अभिमानानं तो मुलगा म्हणाला, 'हो, मी आले असं असतं ते.'
मी त्या मुलीच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. तिचे डोळे कुठला तरी सॅव्हेज रिप्लाय शोधत होते. तो सापडला आणि नजरेमध्ये नजर रोखुनी वगैरे ती त्याला म्हणाली, "मी आले, तर मग तू रे कोण? लसूण?'
एरवी पुणेरी बाण्यामुळे ताठ झालेला त्याचा अभिमान दोन दिवस जुन्या केळाप्रमाणे पार मऊ मऊ झाला. ओशाळला तो. तिला हसू आवरेना. ती लटक्या गोडीनं त्याचा गाल ओढून म्हणाली, 'असू दे रे कांद्या, आमच्याकडे असंच म्ह-ण-त्या-त.'
-सौरभ राघवेंद्र